चाहत

 


क्यु ? आखिर क्यु बार बार मैं वही आ जाती हूँ ? जिसको कदर नहीं उसी पर रुक जाती हूँ ll 

रोती हूँ दिल में पर, उसको कोई गम नहीं ll 

तड़पती हूँ हर दिन पर, उसको कोई रेहम नहीं ll   

उसकी एक झलक के लिए पता नहीं क्या क्या बहाने बनती हूँ, पर उसको कोई अहसास ही नहीं ll 

अब खुद को रोकना चाहती हूँ, इस तकलीफ से छुटना चाहती हूँ ll 

तू आये या ना आये मुझको कोई परवाह नहीं क्युकी, अब मैं खुद के लिए जीना चाहती हूँ ll 

Share:

इंतजार

 

हर दिन सोचती हूँ की, मैंने तुम्हे आज समझ लिया,

पर पता नहीं क्यु, आज से जादा कल तुम और उलछ जाते हो ll 

मुझे देखके चेहरे की हसी तो छुपा लेते हो, पर उन आँखों का क्या? उसमें तो दिखा देते हो ll 

मेरी एक झलक से खुश तो जरुर होते हो, फिर अनदेखा करने का नाटक क्यु करते हो ll 

मुझसे बात करने का मन तो बहोत होता है, फिर मुह फेरके अजनबी जैसा व्यवहार क्यु करते हो ll 

कोई मुझे देखता रहे ये तुम्हे पसंद नहीं, फिर तुम ही क्यु नहीं देखते जो इतना सताते हो ll 

तडफता है ये दिल, तुम्हारी एक मुस्कान के लिए, क्या उतना भी हक़ नहीं है मेरा, जो इतनी बड़ी सजा देते हो ll 

कब तक ऐसे जीना होगा, कभी तो तुम्हे समझाना होगा, माना प्यार है मेरा पर, तुम्हे भी दिखाना होगा ll 

भुल गयी हूँ मैं सारी हदे, अब और इंतजार नहीं होता, क्या तुम्हारा दिल, मेरे लिए कभी तड़पता नहीं होगा ? 

Share:

मोबाइल एक नशा

 

        "अहो तुम्ही काय करताय जरा नीट उभ्या रहा ना...? अहो तुमची बॅग लागतेय मला बाजूला घ्या ना,  अहो तुम्ही मला पुर्णपणे चेपून टाकलय, शी..., अहो तुमची बॅग बाजूला घ्या ना आणि जरा नीट उभ्या रहा ना."

       हे सगळं मी एकटीच बडबडत होती. मागून काहीच हालचाल दिसेना म्हणून शेवटी रागाने मागे पहिलं तर, मॅडम कानात ईयर फोन चे गोळे घालून मोबाइल सावरत होती. तिची बॅग कुठे लटकली आहे याची तिला जराही काळजी नव्हती. तिचा पुर्णपणे लक्ष तिच्या मोबाइलमध्ये होता. तीच मोबाइल सावरण बघून माझी अजूनच सटकली, "अग ये बाई, तो मोबाइल ठेव बाजूला आणि बॅग काढ अडकलीय ती." किती वेळा बोलायचं तुला..?

       शेवटी तिने मला अपेक्षित असच उत्तर दिल, "तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे ओ...?"

अस उत्तर देणार्‍यांच्या वाटत सट- सट कानाखाली वाजवावी. एक तर तुम्ही दुसर्‍याला त्रास देणार आणि वरुन अरेरावी.

       कुर्ला ते दादर, म्हणायला अंतर फारच कमी पण प्रचंड गर्दी. आणि त्यात ऑफिस टाइम, त्यामुळे सगळी गर्दी ही फास्ट ट्रेनला. अक्षराश: लोक दरवाजाला लटकुन प्रवास करतात. कोणाचा हात दुसर्‍याच्या हातात जावून जरी अडकला तरी तो दादर येईपर्यंत तसाच ठेवावा लागतो. एवढया गर्दीत पाठ आणि पोट एक होवून जात, जस काही सर्वजण statues गेम खेळत असतात.

त्यात हे मोबाइल अॅडिक्ट यूजर, कोणाच्या ईयरफोनच्या वायरमध्ये बॅग अडकते, कुठे हात अडकतो, चुकून ह्यांना धक्का लागून मोबाइल ट्रेनमध्ये पडला तर हयांच चाक-चूक चालू आणि काही महाभाग तर दुसर्‍याच्या खांदयावर मोबाइल ठेवून खुशाल चॅटिंग करत असतात. काही तर दरवाजाला लटकलेले असतात, जीव गेला तरी चालेल पण मोबाइल हातातून सुटू देणार नाही.  

       न राहवून मी पूर्ण लेडिज डब्यात सवत्र नजर फिरवली आणि पाहते तर काय आश्चर्य, १००% लेडीज मध्ये ८०% लेडीज वर्ग मोबाइल मध्ये एवढा दंग आहे की त्यांना आपल्या आजूबाजूला काय चाललय, याच जराही भान नव्हतं. राहिलेल्या २०% लेडीजमध्ये कोणी गप्पा मारतय, तर कोणी पुस्तक वाचतय, कोणी देवाचं नामस्मरण करतय, तर कोण झोपा काढतय, आणि कोणी इतरांच निरीक्षण करतय.... त्यात मी ही एक होती...! ट्रेनचा वेग वाढला आणि माझ्याही मेंदूने जोर धरला तो थेट मोबाइलचा (smartphone) शोध कोणी लावला इथपर्यंत जावून पोचला, “ विज्ञानाला आपण जाळ्यात अडकवलय की विज्ञानाने आपल्याला जाळ्यात फासलय हा प्रश्न मनात उभा राहिला...? तंत्रज्ञानाने आपले जीवन नक्कीच सोप झाल आहे पण याच तंत्रज्ञानाने आपल जगणं मुश्किल करून ठेवल आहे हेही तेवढच खर, एवढसा तो मोबाइल, अगदी हाताच्या पंज्या एवढा, पण पूर्ण विश्वच व्यापून टाकलय याने...  गूगल, यू ट्यूब, व्हॉटसअप, फेसबूक, इंस्टाग्राम, टिक- टॉक, क्यंडी क्रश, टेम्पल रन हाश….! आणि बरच काही...

       आजकाल बाजूच्या रूममध्ये राहणार्‍या व्यक्तिला सुद्धा व्हाट्सअप्प वरून “गुड मॉर्निंग” केल जात. आणि तिच व्यक्ती समोर आल्यावर बोलायचे सुद्धा कष्ट पडतात आपल्याला. टिक टॉक वर फेमस कोण आहे याची खबर असते पण बाजूच्या रूममध्ये नेबर्स कोण आहेत याची खबर नसते आपल्याला. अभिनंदन किंवा श्रद्धांजली देण्यासाठी स्टेटस ठेवला जातो पण नात्यात मात्र डिस्टन्स ठेवला जातो. कामावरून घरी आलेल्या नवरा बायकोला एकमेकांशी बोलायला टाइम नाही पण मोबाइल वर तासनतास चॅटिंग करण प्राइम आहे.

      खरच, आमचं जीवन फारच सुंदर होत हो, भातुकली चे खेळ, कबड्डी, खोखो, पकडा - पकडी, लपा – छुपी, चेंडू- फळी, लंगडी, विटी- दांडू, लगोरी, टायर चालवणे, गोट्या खेळणे, ठिकरी, पच्ची, आणि किती सारे खेळ या सर्व खेळांसामोर त्या टेम्पल रन किंवा तो pubg ची सर येणार का...? आजकालच्या मुलांना जर प्रश्न विचारला बाळा, तू क्रिकेट खेळतो...? हो...! कुठे जाता तुम्ही खेळायला...? तर उत्तर येत, मोबाइलवर...! पण यात त्या मुलांची काहीच चूक नाही. कम्प्युटर युगातील मूल ती, अजून काय उत्तर देणार...? खर तर याला जबाबदार पण आपणच आहोत. हट्टी मुलं, आई वडिलांना त्रास देतात म्हणून हातात मोबाइल देवून शांत करण, छोट बाळं जेवत नाही म्हणून मोबाइल वर गाणी लावून जेवायला भरवण, मुलांच्या समोर मोबाइलचा जास्त वापर करन, ह्या सगळ्या सवयी आपणच मुलांना लावतो आणि त्यांचं बालपण हिरावून घेतो. मैदानी खेळ तर फारच कमी खेळले जातात मुंबई सारख्या शहरात, त्यात आपली मुल बाहेर किती सुरक्षित आहेत ही भीती. त्यामुळे मुलांना घरीच बंद केल जात आणि पर्याय म्हणून मोबाइल हातात दिला जातो.


      मोबाइल म्हणजे काय हे आम्हाला बारावी नंतर कळलं असेल, खर जीवन तर आम्ही जगलो, मित्र- मैत्रिणींशी तासनंतास गप्पा मारताना विषयाची कधी गरजच भासली नाही. नाव, गाव, फळ, फूल या सारखे खेळ खेळताना वेळेचं कधी भानच राहील नाही. काटा पायात रुतेल याची पर्वा न करता करवंदीच्या झाडीत घुसून लाल लाल करवंद तोडून खाणे, जांभळ खावून जांभळी झालेली जीभ दाखवणे याची मजा कुठेच नाही. दुसर्‍यांच्या कुंपणात चोरून घुसून पेरु, कैर्‍या तोडताना चार शिव्या ऐकल्याशिवाय करमलच नाही. तोडलेल्या कैर्‍यांची खिरमट (कच्चे गोड लोणचे) बनवणे, मग त्यासाठी लागणार साहित्य प्रत्येकाने आपआपल्या घरातून एक एक वस्तु घेवून येण. मसाला, मीठ, तेल, साखर आणि मग त्यात कैरीचे तुकडे टाकुण ते सर्वांना कागदाच्या तुकड्यावर वाटण, म्हणजे आम्हा मुलांसाठी ती एक प्रकारची पार्टीच असायची. चिंचा तोडून खिसे भरून शाळेत नेवून इतरांना वाटण पण त्यासाठी होणारी भांडण. केस एवढेसे असले तरी आबोलीची फूल गोळा करून त्याचे मोठेच्या मोठे गजरे माळणे. वेळ कुठे घालवायचा हा प्रश्न कधी पडलाच नाही. पण आजकालच्या मुंबईच्या मुलांना वेळ कसा काढायचा हा प्रश्न पडतो…? स्कूल आणि मग ट्यूशन यातच दिवस निघून जातो आणि फावल्या वेळेत होमवर्क किंवा मग मोबाइल वर गेम खेळणं याशिवाय काही पर्याय उरत नाही. कारण ही मूल कम्प्युटर युगातील त्यामुळे स्पर्धाही तेवढीच जास्त. वयाअगोदर मूल मोठी होवू लागली आहेत. आजची तरुण पिढी पोर्न, ब्ल्यु फिल्म सारख्या महिषासुराच्या जाळ्यात अडकत चालली आहेत. सेल्फी काढण्याच्या नादात बहुतेक मुलांना जीव गमवावे लागले आहेत. वयाअगोदर शारीरिक द्रुष्ट्या मुलं अपंग होवू लागली आहेत. आजकालच्या ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे अगदी पहिलीच्या मुलालाही मोबाइल वापरण निकषाचे झाले आहे. त्यात करोनासारख्या माहामारीत तर मोबाइल आणि लॅपटॉप हे अगदी “तेरे बिना नही जीना” अशी परिस्थिति झाली आहे. मोबाइलवर गाणी ऐकण्याच्या सवयीमुळे अपघातचे प्रमाण वाढले आहे. नवरा बायको मध्ये घटस्पोटाचे प्रमाण वाढले आहे. दैनदीन जीवनातील महत्वाच्या गोष्टीसाठीही पुर्णपणे मोबाइल वर अवलंबून राहावं लागत आहे. आज कोणीही अगदी सहजपणे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली वैयक्तिक माहिती मिळवू शकतो. त्यातच सायबर- क्राइममध्ये एखादा मोबाइल हॅक झाला तर त्याची सर्व जमापुंजी एवघ्या क्षणात रिकामी होवू शकते. मोबाइल हा नक्कीच एक वरदान आहे पण त्याच्या वाढत्या दुरुपयोगामुळे तो एक प्रकारे शाप बनत चालला आहे. आमच्या काळातही संशोधन होत पण विकास मात्र कमी होता. ह्या संशोधनाच्या ओझ्याखाली मूल आपल बालपण हरवून बसली आहेत. तरुण पिढी एकमेकाचा सहवास हरवून बसली आहे आणि प्रौढ आपल्याच घरात राहणार्‍या मुलांना हरवून बसले आहेत. मोबाइलमुळे लांबची माणस नक्कीच जवळ आली असतील पण जवळची माणस खूप लांब गेली आहेत.    

       ट्रेन दादर स्टेशनला थांबली तश्या सर्व बायका उतरण्याची घाई करू लागल्या. माझ्या बाजूची खांदयाला खांदा लावून चालणारी एक मुलगी मोबाइल वर बोलत ट्रेन मधून उतरत होती, या नादात उतरता – उतरता तिचा हात माझ्या चष्म्याला लागला आणि माझा चष्मा प्लॅटफॉर्म वर पडला त्याचे सरळ दोन तुकडे झाले. रागाच्या भरात मी तिला पहिलं पण तिला या सर्वांच भान कुठे होत ती मस्त आपल्या मोबाइलच्या दुनियेत दुसर्‍या बाजूने निघून गेली... मी मात्र माझा तुटलेला चष्मा उचलत आतल्या आत तिला शिव्या घालत चालू लागली. आता यात चूक कोणाची...? मोबाइलची की त्या नोमोफोबिया वाल्या मुलीची...?   

Share:

साद

किती साद घालू तुला एकटीच मी राहिले, 
कुणी ना माझे ना मी कुणाची राहिले......
तू साथ सोडिता माझी त्या अश्रूंनी साज मी ल्याले
आज पुन्हा मी एकटीच राहिले....


Share:

वादळवाट

काळ्या रात्रीचा अंधार पुन्हा उद्याची पहाट
जशी वाळवंटामध्ये हरवली होती तिच्या आयुष्याची वादळवाट,


Share:

आवडतं

आवडतं मला तुझ्याशी तासं न तास गप्पा मारायलाउगाचंच स्वतःशी वेड्यासारखं हसायला ...


Share:

वेदना

समुद्राच्या लाटांना आज ती वेड्यासारखी मिठी मारत होती. 
तोडून सारे पाश कर्तव्याचे वार्‍यावर स्वार झाली होती.
अनवाणी पायांनी आज ती वेदना सोडवत होती.


Share:

नवीन पोस्ट

प्रेम म्हणजे

प्रेम म्हणजे काय असत हे मला कधी कळलच नाही... ?           मुलगी म्हणून बापाने कधी जवळच घेतलं नाही...! आईच तरी काय बोलावं बापाच्या...