Showing posts with label मराठी कविता. Show all posts
Showing posts with label मराठी कविता. Show all posts

वेदना

समुद्राच्या लाटांना आज ती वेड्यासारखी मिठी मारत होती. 
तोडून सारे पाश कर्तव्याचे वार्‍यावर स्वार झाली होती.
अनवाणी पायांनी आज ती वेदना सोडवत होती.


Share:

प्रेम

शब्द नाहीत माझ्याकडे तुझे प्रेम गुंफायला,
मन मात्र आता लागलयं तुझ्या मनाशी जुळायला. 
सतत तुझाच विचार असतो आता ह्या मनामध्ये, 
उगाच च लागलय आता तुझ्या प्रेमामध्ये झुरायला...   


Share:

शब्द

लिहिण्यासाठी होते बरेच तिच्या  मनात,
त्याच्या हातात नेहमीच तिचा गुंफलेला हात,
ती प्रत्येक शब्द लिहत असे फक्त त्याच्याचसाठी, 
अन तो हरवत असे फक्त तिच्याचसाठी.... ❤❤❤

Share:

प्रेम म्हणजे


प्रेम म्हणजे काय असत हे मला कधी कळलच नाही...?

          मुलगी म्हणून बापाने कधी जवळच घेतलं नाही...!
आईच तरी काय बोलावं बापाच्या शब्दाबाहेर जाण्याची हिम्मतच झाली नाही...!
          भावू तरी काय करतील त्यांना काही कळतच नाही....!

शाळेत गेली पण बाईनाही मी आवडली नाही...!
त्यांच्या मुलीपेक्षा हुशार आहे ही गोष्ट त्यांना पटली नाही...!
 म्हणूनच सतत शेंबडया म्हणून हिनवायची सवय काय त्यांची गेली नाही...!

भेटला एक मित्र पण त्यानेही साथ दिली नाही...!
म्हटलं आता तरी होईल स्वप्न पूर्ण पण त्या स्वप्नातही काही अर्थच नाही...! 
मैत्रिणीशी प्रेम करून म्हणतो मी तुझ्याशी कधी प्रेमच केल नाही...! 

हसून म्हटलं दोष तुझा नाही रे बाबा, माझ्या आयुष्यात प्रेमच नाही...!
सगळेच का सोडून जातात हेच मला कधी कळलं नाही...!
अस वाटत चूक माझीच होती म्हणूनच मी कोणाला आवडली नाही....!💔💔💔




Share:

हरवले क्षण

हरवले क्षण तिचे त्याच्या सोबती ने जगलेले,
हरवली ती  पुन्हा त्याच्या आठवणी मध्ये,
जगली ती  आयुष्य त्याच्या सोबतीने,
आता हीच तिची ओळख त्याच्या साठवणी मध्ये. 💔


Share:

अश्रु

पावसात भिजल की एक मात्र बर असत,
कितीही रडल तरी कुणाला काही कळत नसत. 😢

Share:

अंधार

त्या काळोखातही मी काहीतरी शोधत होते.....
कारण तुझे प्रेम मी हरवले होते.....
माहीत नाही मिळेल की नाही ????
तुला माहीत असल्यास सांग ना रे काही....!!!
💔💔💔
Share:

सखी

तुझी माझी मैत्री, मी काही न बोलावे अन तुला सारे काही समजावे,  
तुझी माझी मैत्री , एक झालेल्या श्वासाची, एक झालेल्या नात्याची, 
मी तुझ्याकडे पाहावे अन तुला समजावे हितगुज माझ्या मनाचे,
तुझी माझी मैत्री, एक नाते रक्ताचे नसले तरीही जीवाभावाचे. 

सखी....... नात तुझं माझं.  
Share:

स्पर्श


💘 त्याने आपल्या ओझरत्या स्पर्शासाठी मनोमनी झुरावे,
त्याच्या प्रत्येक श्वासात फक्त आपलेच नाव उरावें,
आपल्या मनातले प्रेम त्याला आयुष्यभर पुरावे,
अन् त्याचा हात आपल्याच हातात असताना आपलं आयुष्य सरावे  💘






सखी 💙💙💙
Share:

ओलावा

पानांवरचा ओलावा,
पाऊस पडल्याचा पुरावा देतो.
तुझ्या माझ्यातला दुरावा, 
तू मला विसरण्याचा पुरावा देतो. 💔💔💔

Share: